Advertisement

थायलंडच्या गुहेत अडकलेल्या फुटबॉलपटूंवर बनणार सिनेमा!


थायलंडच्या गुहेत अडकलेल्या फुटबॉलपटूंवर बनणार सिनेमा!
SHARES

काही दिवसांपूर्वी थायलंडची युवा फुटबाॅल टीम थायलंडमधील थाम लुअांग गुहेत अडकली होती. ११ ते १७ वर्षांखालील फुटबाॅलपटू अाणि त्यांचे २५ वर्षीय प्रशिक्षक असे १२ जण दोन अाठवड्यांपासून गुहेत अडकले होते. दोन अाठवड्याच्या खडतर प्रयत्नांअंती त्यांची जिवंत सुटका करण्यात अाली. या संपूर्ण घटनेवर अाता सिनेमा बनणार अाहे.


काय होती घटना?

थायलंडमधील चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत जवळपास १६ दिवस अडकलेल्या १२ फुटबालपटूंसह प्रशिक्षकांना मोठ्या जिकीरीने मंगळवारी बाहेर काढण्यात आलं होतं. याकामी भारतीय तंत्रज्ञांचीही मदत घेण्यात आली होती. ‘गाॅड्स नाॅट डेड’ सिनेमाचे निर्माते आणि प्युअरफिक्सचे मॅनेजिंग पार्टनर मायकेल स्काॅट थायलंडमधील या घटनेवर सिनेमा बनवणार आहेत. सध्या थायलंडनिवासी असलेल्या स्काॅट यांनी या गुहेची पाहणी केली आहे.


काॅपी राइट्सविषयी बोलणी सुरू

या घटनेवर स्काॅट आणि त्यांचे सहनिर्माते अॅडम स्मिथ यांची गुहेत अडकलेले फुटबालपटू, त्यांचे कुटुंबिय आणि थायलंडच्या नेव्ही सील कमांडो रेस्क्यू टीमशी लेखनासंबंधीच्या अधिकारांविषयी बोलणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेकडे आपण सिनेमाच्या दृष्टिकोनातून पाहत असून ही कथा जगभरातील लोकांसाठी प्रेरणदायी ठरेल, अशी अशा स्काॅट यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा -

अभिषेक नायर बनला केकेअार अकादमीचा मुख्य प्रशिक्षक

मालिका दिग्दर्शक बनला पायलटसंबंधित विषय
Advertisement