Advertisement

अधिकारी ब्रदर्सचे संस्थापक गौतम अधिकारी यांचे निधन


अधिकारी ब्रदर्सचे संस्थापक गौतम अधिकारी यांचे निधन
SHARES

दामिनी, हॅलो इन्सपेक्टर, एक शून्य शून्य, बंदीनी या मालिकांचं नाव घेतलं तर आजही आपल्यासमोर 'अधिकारी ब्रदर्स'चं नाव येते. याच अधिकारी ब्रदर्सचे सर्वेसर्वा गौतम अधिकारी (67) यांचं शुक्रवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी 11 वाजता विले पार्ले (प.) येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


1985 मध्ये श्री अधिकारी ब्रदर्सची केली स्थापना

गौतम अधिकारी यांनी भाऊ मार्कंड अधिकारी यांच्यासोबत 1985 मध्ये 'श्री अधिकारी ब्रदर्स' (एसएबी) या ग्रुपची स्थापना केली. 1995 मध्ये हा ग्रुप बीएसईमध्ये सूचीबद्ध केला. त्यानंतर बीएसईमध्ये टेलिकॉम होणारी दूरदर्शन ही पहिली कंपनी बनली.

गौतम अधिकारी आणि भाऊ मार्कंड यांनी सब या एन्टरटेन्मेट चॅनलचीही स्थापना केली होती. मराठी, हिंदीत अनेक मालिका गाजवणारे दिग्दर्शक गौतम अधिकारी यांचं नाव आजही आदराने घेतले जाते. गौतम यांनी टीव्ही मालिकांच्या सर्वाधिक एपिसोडचं दिग्दर्शन करण्याचा रेकॉर्ड केल्यानं लिम्का बुकमध्ये याची नोंद झाली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा