मुंबई - आपल्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आयुष्यात काय चालले आहे? हे ऐकायला सर्वांना नक्कीच आवडेल. पण हे सगळे आपल्याला करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या शोमधून पाहायला मिळत होते.
आता करण त्याच्या याच शोचे नवे पर्व लवकरच सुरू करणार आहे. यामध्ये आश्चर्यचकीत करणाऱ्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सोशल मीडियावर करण जोहरने नुकतीच याची घोषणा केली आहे. या शोच्या आधीच्या पर्वाला प्रेक्षकांची भरभरून पसंती दिली होती. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी, करिना कपूर, सैफ अली खान, प्रिती झिंटा, ऐश्वर्या राय-बच्चन, संजय लीला भन्साळी, फराह खानसह दिग्गज कलाकारांनी या शोला हजेरी लावली होती. ‘कॉफी विथ करण’ हा शो स्टार वर्ल्ड एचडीवर प्रसारित होणार आहे. आता नव्या पर्वात कोण-कोण पाहायला मिळणार हे तर शो सुरू झाल्यानंतरच कळेल?