'कलर्स'ने मागितली माफी


  • 'कलर्स'ने मागितली माफी
SHARE

मुंबई - कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या "कॉमेडी नाईट्स बचाओ" या कार्यक्रमात वर्णद्वेषी टिप्पणी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘पार्च्ड’ सिनेमातील अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी हिने कॉमेडी नाईट्समध्ये आपल्यावर वर्णद्वेशी टिप्पणी झाल्याचा आरोप केला असून, तिला आलेल्या वाईट अनुभवाची माहिती तिने सोशल अकाऊंट वर पोस्ट केली आहे. तनिष्ठाची ही पोस्ट सध्या वायरल होताना दिसत आहे.

तनिष्ठाने फेसबूकवरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. "मला पार्च्ड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'कॉमेडी नाईट्स बचाओ' या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मला रोस्टिंगची कल्पना दिली होती, तेव्हा अमेरिकन शो सॅटर्डे लाईव्ह प्रमाणे हलकाफुलका विनोद असेल, असे मला वाटले होते. पण कार्यक्रमात माझ्या काळ्या रंगावर त्यांनी टिपणी करायला सुरुवात केली. तुला जांभूळ खूपच आवडत असेल ना? लहानपणापासून किती जांभळे खाल्लीस, असले हीन दर्जाचे विनोद त्यांनी सुरू केले. त्यांना माझी चेष्टा करण्यासाठी काळ्या रंगाशिवाय दुसरा एकही विषय मिळू नये, याचे मला आश्चर्य वाटते. अशा अत्यंत वर्णद्वेषी कार्यक्रमात मी बसल्याचाही खेद वाटला.’ असे तनिष्ठाने म्हटले आहे. या सगळ्या प्रकारानंतर कलर्स वाहिनीतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या