Advertisement

आहे वाद तरीही...'न्यूड' सिनेमाचा टीजर लॉन्च!


आहे वाद तरीही...'न्यूड' सिनेमाचा टीजर लॉन्च!
SHARES

गेले अनेक दिवस रवी जाधव यांच्या 'न्यूड' सिनेमाची चर्चा सुरु आहे. आता हळूहळू संपूर्ण मराठी सिनेसृष्टी रवी जाधवच्या बाजूनी उभी राहायला लागली आहे. गोव्यात होणाऱ्या ४८ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवातून मराठी चित्रपट 'न्यूड'ला वगळल्याच्या निषेधार्थ आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झालीये.

"बऱ्याच वर्षांनी ‘मराठी’ चित्रपटाला IFFI च्या ओपनिंग चित्रपटाचा बहुमान प्राप्त झाला असता...असो...वाईट त्या ज्युरींचे वाटते...इतका वेळ देऊन, प्रत्येक चित्रपट काळजीपूर्वक पाहून जर त्यांचा निर्णय अंतिम नसेल, तर त्यांचा वेळ मुळात का वाया घालवला? It’s really sad and disappointing...चित्रपट कोणासाठी करायचा? प्रेक्षकांसाठी की मिनीस्ट्रीसाठी? तो बघायचा की नाही हे कोण ठरविणार? प्रेक्षक की मिनीस्ट्री? ‘माहिती’ आणि प्रसारण मंत्रालय ईफ्फीमधून माझा चित्रपट का वगळला, याची कृपया ‘माहिती’ देईल का?" असा सवाल रवी जाधव यांनी केलाय.



या महोत्सवातील चित्रपटांच्या निर्मात्यांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही 'न्यूड'च्या समर्थनार्थ धावून आले आहेत.

जितेंद्र जोशी, सुबोध भावे, विजू माने, उमेश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, रेणुका शहाणे असे बरेच कलाकार आता रवी जाधव यांच्या बाजूने बोलू लागले आहेत. आणि या वेळच्या IFFI वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.


'न्यूड' चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी पद्मावती आणि न्यूड या दोन चित्रपटांमध्ये केंद्र सरकारच्या दुटप्पीपणावर टीका केली आहे. एकीकडे सरकार वाद सुरू असलेल्या पद्मावती चित्रपटाला सुरक्षा देते आहे आणि दुसरीकडे ‘न्यूड’ सारखा चित्रपट न पाहाता त्याला महोत्सवातून हटवले जाते आहे. ‘पद्मावती’ चित्रपटाला सुरक्षा देण्यापूर्वी त्या चित्रपटाच्या निर्मात्याशी चर्चा केलीच असणार, मग आमच्या चित्रपटांना महोत्सवातून हटवताना आमच्याशी चर्चा का केली नाही, असा सवाल ही जाधव यांनी केला आहे.



एकीकडे एवढं सगळं होत असताना दुसरीकडे ज्या सिनेमाची एवढी चर्चा सुरु आहे  त्या ' न्यूड' सिनेमाचा टीजर रवी जाधब यांनी त्यांना सोशल प्रोफाइल माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणलाय.

"ज्या चित्रपटावरून एवढा वाद चाललाय त्या 'न्यूड' चित्रपटाचा हा टीजर. जो वाद होतोय तो खरंच अत्यंत दुर्दैवी व खेदजनक आहे. या चित्रपटात एका कलाकाराच्या कानाखाली मारली जाते जे दुर्दैवाने आता माझ्या बाबतीत खरं ठरतंय. तरीही सर्व कलाकारांसारखा मीही अजून आशावादी आहे. सर्व IFFI ज्युरी, मीडिया व चित्रकर्मी मित्रांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल शतशः आभार. मनापासून केलेला हा चित्रपट आहे. टीजर आवडला तर नक्की शेअर करा. कमेंटमध्ये youtube लिंक टाकत आहे." असं म्हणत रवी जाधव यांनी या सिनेमाचा टीजर रिलीज केलाय.





हेही वाचा

इफ्फीचे 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर'...अमिताभ बच्चन!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा