'रात्रीस खेळ’ थांबणार

 Pali Hill
'रात्रीस खेळ’ थांबणार

मुंबई - सासू-सुनेच्या भांडणा व्यतिरिक्त वेगळे कथानक आणि विषय घेऊन आलेली मालिका 'रात्रीस खेळ चाले' आता निरोप घेणार आहे. कोकणातील एकत्रित कुटुंब पद्धती, नात्यांमधील प्रेम, दुरावा, विश्वास, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर मालिकेचे कथानक आधारीत आहे. झी मराठीवर सुरू असलेल्या या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मन जिंकली. खूप फेमस कलाकार नसतानाही या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.

दिवसेंदिवस उत्कंठा वाढवणाऱ्या या वाड्यात घडणाऱ्या घटनांमागचा खरा गुन्हेगार कोण? याचे उत्तर घरातील मंडळी आपापसातच शोधत आहेत. पण त्यांना आणि प्रेक्षकांना हवे असलेले उत्तर दिवाळीपूर्वीच मिळणार आहे. त्यामुळे मालिकेतील गुढ आणखी वाढले आहे.

Loading Comments