Advertisement

दीपिका कक्कर इब्राहीम ठरली बीग बॉसच्या १२ व्या पर्वाची विजेती

बिग बॉसच्या १२ सिझनच्या फायनलमध्ये सर्वात आधी करणवीर बाहेर गेला. त्यानंतर दीपिका, श्रीशांत आणि दिपक या अंतिम तिघांमध्ये विजेते पदासाठी लढत झाली. यावेळी दिपकनं २० लाख रुपये घेत स्वत:हून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता.

दीपिका कक्कर इब्राहीम ठरली बीग बॉसच्या १२ व्या पर्वाची विजेती
SHARES

टेलिव्हीजनची स्टार असलेली दीपिका कक्कर इब्राहीम बिग बॉसच्या १२ व्या पर्वाची विजेती ठरली आहे. तर माजी क्रिकेटपटू श्रीशांत उपविजेता ठरला आहे. बिग बॉसच्या १२ व्या विजेते पदासाठी दीपिका कक्कर, श्रीशांत, दिपक ठाकूर, करणवीर बोहरा, रोमील चौधरी स्पर्धेत होते. या पाच जणांमधून दीपिका कक्करने बाजी मारली असून दीपिकाच्या विजयाची औपचारिक घोषणा सलमान खाननं केली. 


दिपक स्वत:हून बाहेर

बिग बॉसच्या १२ सिझनच्या फायनलमध्ये सर्वात आधी करणवीर बाहेर गेला. त्यानंतर दीपिका, श्रीशांत आणि दिपक या अंतिम तिघांमध्ये विजेते पदासाठी लढत झाली. यावेळी दिपकनं २० लाख रुपये घेत स्वत:हून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं या शोमधील बहिण-भावाची जोडी म्हणजे दीपिका आणि श्रीशांत यांच्यात अंतिम लढत झाली. 


३० लाख मिळणार

बिग बॉसच्या १२ व्या पर्वाची फायनल सुरु होण्याआधीच सोशल मीडियावर श्रीशांत हा विजेता असल्याची चर्चा सुरु होती. परंतू, सलमान खानने अखेर दीपिका कक्कर ही १२ व्या पर्वाची विजेती असल्याचे घोषित केलं. दीपिका हिला बिग बॉसची ट्रॉफी आणि ३० लाख रुपयांचं बक्षिस देण्यात आलं आहे. हेही वाचा - 

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाची 'अफवाच'

श्रीदेवीची खुशी बाॅलीवूडच्या वाटेवर!
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा