Advertisement

श्रीदेवीची खुशी बाॅलीवूडच्या वाटेवर!

चित्रपटसृष्टीत दाखल होण्यापूर्वीपासून जान्हवी जशी आपल्या स्टाइल आणि ड्रेसिंगमुळे चर्चेत असायची तशीच खुशीही असते. नवनवीन ट्रेंड्स अनुसार स्वत:ची वेगळी स्टाइल क्रिएट करण्यात खुशी तरबेज आहे. कदाचित याच कारणांमुळे ती कायम चर्चेतही राहते, पण आता ती चर्चेत आली आहे ती करण जोहरकडून मिळालेल्या संकेतांमुळे.

श्रीदेवीची खुशी बाॅलीवूडच्या वाटेवर!
SHARES

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची थोरली मुलगी जान्हवी कपूर काही दिवसांपूर्वीच ‘धडक’ या चित्रपटाद्वारे  बाॅलीवूडमध्ये दाखल झाली आहे. आता तिच्याच पावलावर पाऊल ठेवत श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशीसुद्धा चित्रपटसृष्टीत दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.


स्टाइल, ड्रेसिंगमुळे चर्चेत 

चित्रपटसृष्टीत दाखल होण्यापूर्वीपासून जान्हवी जशी आपल्या स्टाइल आणि ड्रेसिंगमुळे चर्चेत असायची तशीच खुशीही असते. नवनवीन ट्रेंड्स अनुसार स्वत:ची वेगळी स्टाइल क्रिएट करण्यात खुशी तरबेज आहे. कदाचित याच कारणांमुळे ती कायम चर्चेतही राहते, पण आता ती चर्चेत आली आहे ती करण जोहरकडून मिळालेल्या संकेतांमुळे… करणने नेहमीच नवीन कलाकारांना किंबहुना दिग्गज कलाकारांच्या मुलांना ब्रेक देण्याचं काम केलं आहे. यालाच अनुसरून एका शोमध्ये त्याला प्रश्न विचारला असता त्याने खुशी कपूरचं नाव घेतलं.


 प्रवेश जवळजवळ नक्की 

नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर’ या शोमध्ये करणने हजेरी लावली होती. या शोमध्ये नेहाने करणला एक प्रश्न विचारला होता. २०१९ मध्ये कोणकोणत्या कलाकारांची मुलं रुपेरी पडद्यावर झळकू शकतात? असा तो प्रश्न होता. यावर करणने अगदी तत्परतेने खुशीचं नाव घेतलं. यासोबतच त्याने जावेद जाफरीची मुलगी मिजानचाही उल्लेख केला. या दोघी २०१९ मध्ये बाॅलीवूडमधील आकर्षण ठरू शकतात असं मत करणने व्यक्त केलं. यावरून खुशीचा बाॅलीवूडमध्ये प्रवेश जवळजवळ नक्की झाल्याचं चित्र दिसतं.


मिजानही येणार बाॅलीवूडमध्ये

करणप्रमाणेनच संजय लीला भन्साळी यांनीही बऱ्याच कलाकारांच्या मुलांना ब्रेक दिला आहे. भन्साळी आता जावेदची मुलगी मिजानला बॉलीवूडमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा मागील काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. आजवर बऱ्याच कलाकारांच्या मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अॅक्टिंगमध्ये करियर केलं आहे. अलिकडच्या काळात जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, इशान खट्टर यांनी बाॅलीवूडमध्ये आपलं करियर सुरू केलं आहे. त्यामुळे आता खुशीचा चित्रपट कधी येतो याची उत्सुकता श्रीदेवीच्या चाहत्यांना लागली आहे.



हेही वाचा - 

Movie Review: आता 'सिंबा'ची पण सटकली!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा