Advertisement

नागराज नमले...


नागराज नमले...
SHARES

मुंबई - सैराट सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्यातले कलाकार आणि स्वत: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चाहत्यांनी सिनेमा पाहिल्यानंतर खूप प्रेम दिले. पण जसे प्रेम करणारे प्रेक्षक असतात, तसेच त्याच्या आणि सिनेमाच्या विरोधात बोलणारेही कमी नसतात. काही दिवसांपूर्वी नागराज पुन्हा चर्चेत आले ते त्यांनी नागपुरात रिपाईंचे नेते रामदास आठवले यांच्यावर केलेल्या कमेन्टमुळे. एका कार्यक्रमाच्या वेळी रामदास आठवलेंनी 'सैराट'पाहून' मराठ्यांच्या आक्रोशाला सैराट जबाबदार' असं वक्तव्य केलं होतं. त्यावर नागराजला त्याचं मत विचारण्यात आलं आणि नागराजने ' त्यावर मी काही बोलू शकत नाही, तो फार गंमतीचा विषय आहे' असे उत्तर दिले. त्याच्या ह्या प्रतिक्रियेमुळे रिपाई कार्यकर्त्यांनीं 'नागराजने आठवलेंची माफी मागावी अशी मागणी केली. तसेच या संदर्भात त्यांनी बुधवारी घाटकोपर येथे निदर्शनेही केली. या सगळ्या प्रकारानंतर नागराजने त्यांच्या फेसबुक अकाउंटवर आठवलेंची जाहीर माफी मागितली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement