Advertisement

म्हणून 'पद्मावती'च्या काही सीनवर भंसाळी लावणार कात्री


म्हणून 'पद्मावती'च्या काही सीनवर भंसाळी लावणार कात्री
SHARES

संजय लीला भंसाळी यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'पद्मावती'ची चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगत आहे. या सिनेमाबद्दल दर दिवशी वेगळे काहीतरी ऐकायला मिळते. आता या सिनेमाबद्दल पुन्हा एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे भंसाळी यांनी 'पद्मावती'तील काही दृश्यांवर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.


का घेतला असा निर्णय

हा सिनेमा खूपच लांबलचक असल्याने या सिनेमातील काही दृश्यांवर कात्री चालवण्याचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा फायनल कटसह तयार झाला तेव्हा त्याची वेळ 210 मिनिटे होत होती. या सिनेमाची वेळ ही इतर सिनेमाच्या तुलनेत खूप जास्त असून यामुळे प्रेक्षकांना ते कंटाळवाणे वाटू शकते हे फिल्म मेकर्सच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या सिनेमाच्या काही दृश्यांवर कात्री चालवण्याचा निर्णय घेतला.

तसे पाहिले तर या सिनेमाच्या काही दृश्यांवर कात्री चालवणे हे भंसाळी यांच्यासाठी कठीण असणार आहे. कारण या सिनेमात 3 स्टार मुख्य भूमिकेत आहेत. जर कोणात्याही कलाकाराचे सीन कापले गेल्यास ते नाराज होऊ शकतात. त्यामुळे याची काळजी घेत भंसाळी यांनी सिनेमातील काही दृश्यांवर कात्री चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
 


हेही वाचा - 

'पद्मावती'चं पहिलं गाणं लाँच; दीपिकाच्या घुमर डान्सला चाहत्यांची पसंती!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा