'पद्मावती'चा ट्रेलर लाँच १ वाजून ൦३ मिनिटांनीच का?


SHARE

ऐतिहासिक कथानक असलेला 'पद्मावती' चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. १ वाजून ൦३ मिनिटांच्या मुहुर्तावर हा ट्रेलर प्रदर्शित झाला. भव्य सेट, भरजरी कपडे, दागिने ही दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाची खासियत असते. अर्थात ट्रेलरमध्ये संजय लीला भन्साळी यांच्या या वैशिष्ट्यांची झलक पाहायला मिळतेे. चित्रपटात दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, शाहीद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.चित्रपटात शाहीद कपूर यानं राजा रावल रतन सिंह यांची भूमिका साकारली आहे. तर दीपिका राणी पद्मावतीची आणि रणवीर सिंह अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे. 'पद्मावती' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अधिक लक्ष पार्श्वसंगीतावर देण्यात आले असून फक्त दोनच संवाद आहेत. राणी पद्मावती आणि राजा रावल यांच्यातील प्रेम आणि डोळ्यातून आग ओकणारा अल्लाउद्दीन खिल्जी यांची झलक यात पाहावयात मिळते.


ट्रेलर १ वाजून ൦३ मिनिटांनी प्रदर्शित का झाला?

सोमवारी सकाळीच पद्मावतीच्या टीमनं १ वाजून ൦३ मिनिटांनी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. पण हीच वेळ का निवडण्यात आली असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.

याचं गुपित असं आहे की, १ वाजून ൦३ मिनिटे ही वेळ आपण २४ तासाच्या स्वरूपात बदलली तर १३.൦३ अशी वेळ समोर येते. २४ तासांच्या दिनक्रमानुसार १२ नंतरच्या वेळेला आपण १३, १४, १५ अशी मोजणी करतो. इ.स १३൦३ मध्येच महाराजा रतन सिंह आणि अलाउद्दीन खिल्जी यांच्यात युद्ध झालं होतं.'पद्मावती'चा ट्रेलर सुपरहिट

'पद्मावती' चित्रपटाचा ट्रेलर शाहीद कपूर, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणनं आपल्या ट्वीटर हँडलवर शेअर केला आहे. पद्मावतीच्या ट्रेलरला प्रेक्षकांसोबतच सेलिब्रिटींची देखील पसंती मिळत आहे. अवघ्या दोन तासातच ट्रेलरनं एक लाखाहून अधिकचा टप्पा गाठला आहे. 


हेही वाचा - 

'पद्मावती'तील रणवीर सिंहच्या 'अलाउद्दीन खिलजी'चा लूक आऊटडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय