Advertisement

'हा' कलाकार साकारणार 'संभाजी महाराजां'ची भूमिका


'हा' कलाकार साकारणार 'संभाजी महाराजां'ची भूमिका
SHARES

झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपासून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या नव्याने सुरु होणाऱ्या मालिकेचे प्रोमो सुरु झाले आहेत. या ऐतिहासिक मालिकेद्वारे छत्रपती संभाजी महाराज या राजाचा इतिहास पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका कोण करणार? याबद्दल कमालीची उत्सुकता होती. राजांचं हे रुप कसं असेल? हे सांगण्यासाठी एका शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात राजाच्या रुपाचं प्रथम दर्शन दाखवण्यात आलं. ज्यात डॉ. अमोल कोल्हे हे संभाजीराजांचं रुप घेऊन उपस्थितांसमोर अवतरले.



'गेल्या अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेलं स्वप्न आज पूर्ण होत आहे. ज्या राजाने आपल्या कर्तृत्वाने औरंगजेबासारख्या शहेनशहाला मात दिली, ९ वर्षांच्या कारकिर्दीत लढलेल्या सर्व लढाया ज्याने जिंकल्या. अशा अजेय राजाची महती अजूनही आपल्यापर्यंत हवी तशी पोचली नाहीय. ही मालिका म्हणजे त्याच राजाचा दैदिप्यमान इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.

या आधीही अमोल कोल्हे यांनी ऐतिहासिक मालिकेतून 'शिवाजी महाराज' यांची भूमिका साकारली आहे. आता पुन्हा ते संभाजी महाराज या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झालेत.

स्वराज्याबद्दलचं जाज्वल्य प्रेम आणि अभिमानाने भारलेला हा शंभुराजांचा इतिहास प्रेक्षकांना भव्य दिव्य स्वरुपात या मालिकेतून बघता येणार आहे. 

मालिकेची निर्मिती डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली राव आणि पिंकू बिस्वास यांनी केली आहे. येत्या २४ सप्टेंबरला दोन तासांच्या विशेष भागाने मालिकेचा भव्य शुभारंभ होणार असून २५ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. ही मालिका प्रेक्षकांना बघता येणार आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा