Coronavirus cases in Maharashtra: 332Mumbai: 167Pune: 37Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan-Dombivali: 9Thane: 9Navi Mumbai: 8Ahmednagar: 8Vasai-Virar: 6Yavatmal: 4Buldhana: 3Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 12Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

‘त्या’ ऐतिहासिक दिवशी सुरु झालं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’चं शूटिंग


‘त्या’ ऐतिहासिक दिवशी सुरु झालं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’चं शूटिंग
SHARE

आजवर बऱ्याचदा मोठ्या पडद्यावर दिसलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आता छोट्या पडद्यावरही प्रगटणार आहेत. १८ मे पासून सुरू होणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचं चित्रीकरण एका ऐतिहासिक दिवशी सुरू करण्यात आलं.


महाडचा सत्याग्रह

महाडचा सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील महत्त्वाचा लढा. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी भरता यावं यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता. हा लढा फक्त पाण्यापुरता मर्यादित नव्हता, तर ती सुरुवात होती मानवी मुलभूत हक्कांच्या चळवळीची. या घटनेनंतर देशाच्या कानाकोपऱ्यातून समतेचे वारे वाहू लागले. २० मार्च रोजी या घटनेला ९२ वर्ष पूर्ण झाली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशाही याच ऐतिहासिक दिवशी करण्यात आला.


१८ मे पासून सुरू

स्टार प्रवाह वाहिनीवर १८ मे म्हणजेच बुद्धपौर्णिमेपासून सुरु होणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेच्या शूटिंगची सुरुवात २० मार्चला करण्यात आली. प्रत्येकाच्याच मनावर कोरला गेलेला हा दिवस आता या मालिकेतील सर्वांच्या मनावरही कायमचा ठसा उमटवून गेला आहे. या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत सागर देशमुख दिसणार आहे.


निव्वळ योगायोग

पहिल्या दिवसाची आठवण सांगताना सागर म्हणाला की, महाडचा सत्याग्रह ज्यादिवशी झाला त्याच तारखेला बाबासाहेबांवरील मालिकेचं शूटिंग व्हावं हा निव्वळ योगायोग असल्याचं मी मानत नाही. कदाचित काळाची गरज असेल म्हणूनच या सगळ्या गोष्टी जुळून आल्या असाव्यात. बाबासाहेबांचे शिक्षणाबद्दलचे विचार आणि सर्व समाजामध्ये समानता हे विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. या मालिकेचा मुख्य भाग असून, त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम बनल्याचा फार आनंद होत आहे.


जन्मापासूनचा प्रवास 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, अर्थकारण आणि राजकारण याविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचं कार्य आजही तेवढंच परिणामकारक आणि स्फूर्तीदायी ठरतं. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूनं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेची निर्मिती केली आहे. याच कारणास्तव शूटिंगसाठीही ऐतिहासिक दिवसाची निवड करण्यात आली. या मालिकेत बाबासाहेबांचा जन्मापासूनचा प्रवास पहायला मिळेल.हेही वाचा  -

टायगर-आलियाचं 'हुकअप सॉन्ग'

श्रीदेवीच्या दुसऱ्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
संबंधित विषय
ताज्या बातम्या