Advertisement

'क्रिटिक्स चॉइस शॉर्ट फिल्म अॅवॉर्ड्स'ची घोषणा


'क्रिटिक्स चॉइस शॉर्ट फिल्म अॅवॉर्ड्स'ची घोषणा
SHARES

'फिल्म क्रिटिक्स गिल्ड अँड मोशन कंटेंट ग्रुप'च्या वतीने मुंबईत एका भव्य समारंभात पहिल्या क्रिटिक्स 'क्रिटिक्स चॉइस शॉर्ट फिल्म अॅवॉर्ड्स'च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांनीही हजेरी लावली होती. 'संभावताह', 'तुंग्रस' आणि 'ब्लॅक कॅट' या शॅार्ट फिल्म्सने पुरस्कार सोहळ्यावर वर्चस्व गाजवलं.


कुणाचा समावेश?

मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी, श्रीराम राघवन, कुणाल कपूर, गुलशन देविह, श्रिया पिळगावकर, सोहम शाह, मनीष शर्मा, नवीन कस्तुरिया, अमोल गुप्ते, दीपा भाटिया, शिबानी, तनुजा चंद्र, शरत कटारिया आदी कलाकार-तंत्रज्ञ या सोहळ्याला हजर होते.


पुरस्कार विजेते

सर्वोत्कृष्ट लघुपट (फिक्शन) - संभावताह, सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फिक्शन) - तुंग्रस, सर्वोत्कृष्ट अभिनेता - विकास पाटील (संभावताह), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कानी कुसृति (एमएए), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - गौरव मदन (संभावताह) फिक्शन, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - ऋषि चंदना (तुंग्रस)नॉन फिक्शन, सर्वोत्कृष्ट लेखक - गौरव मदन (संभावताह) , सर्वोत्कृष्ट संकलक - नेहा मेहरा (तुंग्रस), 'ब्लँक कॅट'ने या शॉर्ट फिल्मने सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसह बेस्ट स्कोर चा पुरस्कार आपल्या नावे केला.हेही वाचा-

सलमान हिंदीत बनवणार ‘मुळशी पॅटर्न’

१७ व्या 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा'चा शुभारंभसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा