Advertisement

‘तेजाज्ञा’च्या अॅडला ‘वुमन्स डे’चा मुहूर्त

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांनी चार वर्षांपूर्वी एकत्रित येऊन तेजाज्ञा हा डिझाइनर कपड्यांचा ब्रॅँड सुरू केला आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या डिझाइनर ब्रॅन्डला कधीच जाहिरात करण्याची गरज भासली नाही, पण यंदाचा ‘वुमन्स डे’ याला अपवाद ठरला आहे.

‘तेजाज्ञा’च्या अॅडला ‘वुमन्स डे’चा मुहूर्त
SHARES

काही प्राॅडक्टस केवळ माऊथ टु माऊथ पब्लिसिटीनं घराघरात पोहोचतात. त्यामुळंच कधीही, कुठेही त्यांची जाहिरातबाजी केलेली पाहायला मिळत नाही. असाच एक ब्रँड असलेल्या तेजाज्ञा या कपड्यांच्या कलेक्शनची वुमन्स डेचा मुहूर्त साधत पहिली वहिली अॅड प्रदर्शित करण्यात आली आहे.


कपड्यांचा ब्रॅँड

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांनी चार वर्षांपूर्वी एकत्रित येऊन तेजाज्ञा हा डिझाइनर कपड्यांचा ब्रॅँड सुरू केला आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या डिझाइनर ब्रॅन्डला कधीच जाहिरात करण्याची गरज भासली नाही, पण यंदाचा ‘वुमन्स डे’ याला अपवाद ठरला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींनी एकत्र येत तेजाज्ञाची पहिली अॅड फिल्म बनवली आहे.


कलात्मक पध्दतीनं आदरांजली

या अॅड फिल्मविषयी तेजस्विनी म्हणाली की, तेजाज्ञा ब्रँडनं आपल्या वेगवेगळ्या डिझाइनर आऊटफिट्स आणि साड्यांव्दारे वुमनहुडला नेहमीच सेलिब्रेट केलं आहे. पण या वुमन्स डेचं औचित्य साधत नारीशक्तीला ट्रिब्युट देण्याचा विचार आमच्या मनात आला. त्यावरून तेजाज्ञाची पहिली अॅड फिल्म बनवण्याची कल्पना सुचली. महिला दिनी स्त्रीच्या सशक्तीकरणाचे संदेश देणारे व्हिडीयो करण्यापेक्षा आम्ही स्त्रीत्वाला आमच्या आगळ्या कलात्मक पध्दतीनं ही आदरांजली दिली आहे.


विविध माध्यमांमधल्या स्त्रिया

तेजाज्ञाच्या या अॅड फिल्ममध्ये सहा वर्षांच्या लहान मुलीपासून ६० वर्षांच्या ज्येष्ठ स्त्रियांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटांतील आणि क्षेत्रांतील महिला आहेत. याबाबत तेजस्विनी म्हणाली की, सेवानिवृत्त शिक्षिका, ते गृहिणी, डॉक्टर, पोलीस, डिझाइनर, नृत्यांगना आणि शाळेत जाणारी छोटुकली अशा विविध माध्यमांमधल्या स्त्रियांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. हि फिल्म तेजस्विनीसह अभिज्ञा भावे, हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे, स्नेहलता तावडे, सुखदा खांडेकर, सुहासिनी देशपांडे, गार्गी जोशी आणि ज्योती चांदेकर यांवर चित्रीत करण्यात आली आहे. या निमित्तानं तेजस्विनीनं प्रथमच आई ज्योती चांदेकरसोबत अॅड फिल्ममध्ये काम केलं आहे.हेही वाचा -

‘वुमन्स डे’ला डिजीटल इन्फ्लुएन्सर्स कॉनक्लेव्हमध्ये सई

सिनेसृष्टीतील ताऱ्यांच्या मनातील 'महिलाराज'संबंधित विषय
Advertisement