Advertisement

सिंधुदुर्गात रंगणार पहिला कोकण चित्रपट महोत्सव!

महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यात निवडक १० मराठी चित्रपट दाखवण्यात येतील.

सिंधुदुर्गात रंगणार पहिला कोकण चित्रपट महोत्सव!
SHARES

‘सिंधुरत्न कलावंत मंच’ या संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ते १४ मे या कालावधीत कोकण चित्रपट महोत्सवाचे (Kokan Film Festival) आयोजन करण्यात येणार आहे. कोकणातील सांस्कृतिक प्रतिभेचा अधिकाधिक विस्तार आणि तिथल्या गुणी कलाकारांना वाव मिळावा यासाठी महोत्सव राबवण्यात येणार आहे.

महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यात निवडक १० मराठी चित्रपट दाखवण्यात येतील. प्रथम तीन क्रमांकाच्या चित्रपटांना मानांकन दिलं जाईल. त्यानंतर त्यांना सन्मानित करण्यात येणार आङे. सर्वोत्कृष्ट कलाकार, तंत्रज्ञ यांना गौरविण्यात येणार आहे.

तसेच, आतापर्यंत चित्रपटसृष्टी व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या कोकणातील सिंधुरत्नांचा गौरव यावेळी केला जाईल.

स्पर्धेसाठी २०१९ ते २०२१ या कालावधीत सेन्सॉर झालेल्या मराठी चित्रपटांना सहभागी होता येईल. चित्रपट निर्मीती संस्थांनी https://kokanchitrapatmahotsav.com/ या वेबसाइटवर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

१ एप्रिलपासून यासाठी प्रवेशअर्ज करता येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल आहे. या महोत्सवाच्या स्पर्धा विभागासाठी रुपये 1000/-(रुपये एक हजार) प्रवेशिका फी आकारण्यात येणार आहे. अर्ज सादर केलेल्या चित्रपट संस्थानी आपले चित्रपट mov फॉरमॅटमध्ये पेनड्राइव्हवर आणून देणे बंधनकारक आहे.

ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, विजय राणे, छाया कदम, निशा परुळेकर, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे आदि मंडळीनी यासाठी पुढाकार घेतला आहे.



हेही वाचा

ऑस्करमध्ये 'या' भारतीयाचा बोलबाला, वाचा सविस्तर

R R R : रामायण, राष्ट्रप्रेम, राजामौली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा