Advertisement

ऑस्करमध्ये 'या' भारतीयाचा बोलबाला, वाचा सविस्तर

तुम्हाला माहिती आहे का की चित्रपटाच्या या अप्रतिम VFX च्या मागे एका भारतीयाचा हात आहे.

ऑस्करमध्ये 'या' भारतीयाचा बोलबाला, वाचा सविस्तर
SHARES

डेनिस विलेन्युव्हच्या सायन्स फिक्शन ड्यून अकादमी पुरस्कार २०२२ मध्ये अनेक ट्रॉफी जिंकल्या. त्यापैकी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर पुरस्कार भारताला मिळाला आहे.

तुम्हाला माहिती आहे का की चित्रपटाच्या या अप्रतिम VFX च्या मागे एका भारतीयाचा हात आहे.

होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. Dune च्या VFX च्या मागे असलेली एक कंपनी म्हणजे लंडन-आधारित व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अॅनिमेशन DNEG, ज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय वंशाचे नमित मल्होत्रा आहेत. तो बॉलिवूड चित्रपट निर्माते नरेश मल्होत्रा यांचा मुलगा आणि सिनेमॅटोग्राफर एमएन मल्होत्रा यांचा नातू आहे.

नमित मल्होत्राच्या DNEG नावाच्या कंपनीला डॅनियल क्रेग स्टारर जेम्स बाँड चित्रपट 'नो टाईम टू डाय' साठी VFX साठी देखील नामांकन मिळालं होतं. यापूर्वी, त्याच्या कंपनीनं खालील चित्रपटांसाठी सहा अकादमी पुरस्कार जिंकले आहेत: इनसेप्शन, इंटरस्टेलर, एक्स मशीन, ब्लेड रनर 2049, फर्स्ट मॅन आणि टेनेट.

याआधी मल्होत्रा यांनी News18 ला दिलेल्या मुलाखतीत या नामांकनाबाबत बोलले होते. तो म्हणाला, 'ही खूप छान अनुभूती आहे. अनेक वर्षांमध्ये या विशिष्ट श्रेणीत नामांकन मिळालेला हा पहिला जेम्स बाँड चित्रपट आहे.

तर, ड्युनची कथा पडद्यावर आणण्यासाठी व्हिज्युअल इफेक्ट्सचा मोठा वाटा होता.

ड्युन हा फ्रँक हर्बर्टच्या त्याच नावाच्या प्रसिद्ध साय-फाय कादंबरीवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. टिमोथी चालमेट, रेबेका फर्ग्युसन, ऑस्कर इसाक, जोश ब्रोलिन, स्टेलन स्कार्सगार्ड, डेव्ह बौटिस्टा, स्टीफन मॅककिंले हेंडरसन, झेंडाया, डेव्हिड डस्टमाल्चियन, चांग चेन, शेरॉन डंकन-ब्रेवस्टर, शार्लोट रॅम्प्लिंग अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे.

जेवियर बारडेम यांच्या नावाचा समावेश आहे. नमितनं आपल्या मुलाखतीत सांगितलं की, कोरोना महामारीच्या काळात चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम करणं कठीण होते, परंतु त्यांच्या टीमनं ते केलं.

DNEG हे चित्रपट आणि टीव्ही शो जसे की द डार्क नाइट राइजेस, शेरलॉक होम्स, डंकर्क, अल्टेर्ड कार्बन, चेरनोबिल, लास्ट नाईट इन सोहो, फाऊंडेशन इत्यादींसाठी देखील ओळखले जाते.



हेही वाचा

अँड ऑस्कर गोज टू..., भारताला 'या' क्षेणीत मिळाला पुरस्कार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा