Advertisement

‘देव’घराला मालकाची नोटीस!

देव ज्या इमारतीत मागील ७५ वर्षांपासून राहत होते ती इमारत चौधरी कुटुंबीयांच्या मालकीची आहे. देव यांच्या मृत्यूनंतर ते घर पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी चौधरी कुटुंबाने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. देव यांच्या पत्नीने लग्नापूर्वी पागडी पद्धतीने चौधरी यांच्याकडून हे घर घेतलं होतं.

‘देव’घराला मालकाची नोटीस!
SHARES

गीतकार-संगीतकार अशी ख्याती असलेल्या यशवंत देव यांचं २ दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांची चिता थंड होते न होते तोच त्यांच्या दादर येथील घरावर घरमालकाने नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली. दुसऱ्याच दिवशी मालकाने देव यांच्या अस्थी बांधलेल्या दरवाजावरच घर घाली करण्याची नोटीस चिकटवली आहे. मैताच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या या प्रकारामुळे संगीतप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पागडी पद्धतीने घरात वास्तव्य

देव ज्या इमारतीत मागील ७५ वर्षांपासून राहत होते ती इमारत चौधरी कुटुंबीयांच्या मालकीची आहे. देव यांच्या मृत्यूनंतर ते घर पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी चौधरी कुटुंबाने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. देव यांच्या पत्नीने लग्नापूर्वी पागडी पद्धतीने चौधरी यांच्याकडून हे घर घेतलं होतं.

आगाऊ सूचना न देताच नोटीस

लग्नानंतर पत्नीसह देव याच घरात राहिले. इथेच अनेक अजरामर संगीतरचना आकाराला आल्या. देव यांचे पुतणे ज्ञानेश आणि त्यांचं कुटुंबही याच घरात वास्तव्यास आहे. त्यांना कोणतीही आगाऊ सूचना न देता घरमालकाने थेट घर खाली करण्याची नोटीस बजावली आहे.

दिलीप आणि ओजस चौधरी हे देव यांच्या घराचे मालक आहेत. शिवाजी पार्क येथील रानडे रोडवरील वंदन ही इमारत चौधरींच्या मालकीची आहे. सध्या मालक असलेल्या दिलीप आणि ओजस यांच्या पणजोबांनी १९५६- ५७ मध्ये ज्यू धर्मियांकडून ही इमारत विकत घेतली होती. देव हे पागडी पद्धतीने राहात असल्याने घराचे भाडे चौधरी कटुंबीयांना देत होते.हेही वाचा-

संगीतातील 'देव' देवाघरी, ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन

शब्दप्रधान गायकीवर प्रभुत्व गाजवणारे यशवंत देवसंबंधित विषय
Advertisement