SHARE

गोरेगाव - टोपीवाला मंडईचा पुनर्विकास करण्यासाठी पालिकेनं निविदा प्रक्रिया सुरू केलीय. या जागेवर 16 मजली इमारत बांधण्यात येणाराय. यात तीन मजली नाट्यगृह बांधण्यात येणाराय. 867 आसनांचे असं हे वातानुकूलित नाट्यगृह असणाराय. तर या इमारतीत ग्रंथालय, योगा-केंद्र, व्यायामशाळा आणि मंडईही असणाराय. त्यामुळे गोरेगावकरांसाठी एकाच छताखाली अनेक सुविधा उपलब्ध होणारायेत.

या नाट्यगृहात अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था असणाराय. 16 मजली इमारतीसाठी 10 अत्याधुनिक लिफ्ट असणारायेत. तर पार्किंगचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणाराय. या इमारतीच्या बांधकामासाठी 109 कोटींचा खर्च अपेक्षित असून लवकरच बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आलीय. 42 महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळे येत्या चार वर्षांत मुंबईकरांना आणखी एक नाट्यगृह उपलब्ध होणाराय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या