Advertisement

ठाण्यात विशेष मुलांसाठी होळी


ठाण्यात विशेष मुलांसाठी होळी
SHARES

मुलुंड - ठाण्यातील आनंद दिघे विशेष शाळेतल्या मुलांसाठी शुक्रवारी विशेष होळीचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंडमधील विठाई प्रतिष्ठानने या होळीचे आयोजन केले होते. शाळेतील शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या 'विशेष' असणाऱ्या मुलांसोबत निसर्गाला पूरक अशी कोरडी होळी या वेळी खेळण्यात आली. या वेळी मराठी सिनेसृष्टीतील रवी जाधव तसेच अन्य कलाकारही उपस्थित होते. 'गेल्या 12 वर्षांपासून या शाळेत होळी खेळत असून दरवर्षी या निरागस मुलांसोबत होळी खेळताना एक वेगळाच आनंद मिळत असल्याची भावना विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनी व्यक्त केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा