क्रिश-4 चा श्री गणेशा

  Pali Hill
  क्रिश-4 चा श्री गणेशा
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईत सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हृतिक रोशनने ट्विटरवरून शेअर केलेली क्रिशच्या रूपातील गणेशमूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे. हृतिकने क्रिशच्या रूपातील ही गणेशमूर्ती शेअर करत क्रिश-4 या चित्रपटाची घोषणा केली. 

  हृतिकचे क्रिश मालिकेतील चित्रपट लोकप्रिय ठरले असून, त्यांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. त्यामुळे या मालिकेतील पुढील चित्रपटाची सिनेप्रेमी वाट पाहत आहेत. दरम्यान, हृतिकने आज क्रिशच्या रूपातील गणपतीचा फोटा ट्विटरवर टाकला. या फोटोखाली "गणपती बाप्पांचादेखील क्रिश 4 ला आशीर्वाद आहे. तुम्ही सध्या गणेशोत्सवाचा आनंद लुटत असाल. लव्ह यू ऑल"!!! असे ट्विट करत हृतिकने क्रिश 4 च्या शूटिंगला लवकरच मुहूर्त होण्याचे संकेत दिले. हृतिकने अशा वेगळ्या आणि हटके पद्धतीने क्रिश 4 चे संकेत दिल्याने त्याचे ट्विट मुंबईतील चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरले आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.