Advertisement

पद्मावती सिनेमासाठी रविवारी १५ मिनिटांचा ब्लॅकआऊट!


पद्मावती सिनेमासाठी रविवारी १५ मिनिटांचा ब्लॅकआऊट!
SHARES

पद्मावती सिनेमामुळे सुरु झालेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये. कर्णी सेनेचा इशारा, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सिनेमात बदल करण्याची केलेली मागणी आणि राजस्थानमध्ये एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह किल्ल्यावर लटकवण्यापर्यंत हिंसक वळण या वादाने घेतले आहे. मात्र, जितक्या आक्रमकपणे विरोध होत आहे, तितक्याच ठामपणे चित्रपटसृष्टी पद्मावतीच्या पाठिशी उभी राहिलेली दिसत आहे.

इंडियन फिल्म अॅण्ड डायरेक्टर्स असोसिएशन (आयएफटीडीए), फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन उद्योग विश्वाकडून पद्मावतीला होणाऱ्या विरोधाचा निषेध म्हणून १५ मिनिटांचा ब्लॅकआऊट पाळण्यात येणार आहे. कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी हा ब्लॅकआऊट करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


१५ मिनिट शुटिंग बंद

आयएफटीडीएचे सदस्य अशोक पंडित यांनी नक्की कसा असेल हा १५ मिनिटांचा ब्लॅकआऊट याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले, "चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही येत्या रविवारी २६ नोव्हेंबरला १५ मिनिटांचा ब्लॅकआऊट करणार आहोत. या १५ मिनिटांमध्ये मुंबईतलं सगळं शुटिंग १५ मिनिटांसाठी बंद असेल. सर्व स्टुडिओमधली लाईट १५ मिनिटांसाठी बंद करण्यात येईल."

याशिवाय फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन उद्योग समुदायातील सदस्य 'मैं आजाद हूँ' या ब्रीदवाक्यासह २६ नोव्हेंबरला प्रदर्शन करतील. फिल्म सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून या निदर्शनांना दुपारी ३.३० वाजेपासून सुरुवात होईल.

संजय लीला भन्साली यांच्या पद्मावती या सिनेमामध्ये दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये अलाउद्दीन खिलजी आणि राणी पद्मावती यांच्यामध्ये आक्षेपार्ह दृश्य चित्रीत करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.



हेही वाचा

अखेर ‘पद्मावती’ची रिलीज डेट पुढे ढकलली


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा