Advertisement

'पद्मावती' विरोधाला हिंसक वळण, एकाची हत्या करून किल्ल्यात लटकवला मृतदेह


'पद्मावती' विरोधाला हिंसक वळण, एकाची हत्या करून किल्ल्यात लटकवला मृतदेह
SHARES

निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. कर्णी सेना आणि इतर राजकीय पक्षांनी 'पद्मावती'च्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. आता त्यात 'पद्मावती'च्या विरोधाला हिंसक वळण मिळालं आहे. जयपूरमधल्या नाहरगड किल्ल्यात एकाचा मृतदेह आढळला आहे. या मृतदेहाजवळ एका दगडावर मेसेजही लिहिण्यात आला आहे. यात लिहलंय की, 'हम सिर्फ पुतले नहीं लटकाते पद्मावती,'.



मृतकाचं नाव चेतन शर्मा आहे. जयपूरच्या शास्त्रीनगर इथला तो रहिवासी आहे. चेतनजवळ मुंबईचं एक तिकीट मिळालं आहे. असं देखील बोललं जातं की, 'पद्मावती' चित्रपटात चेतन नावाची व्यक्तीरेखा साकारली जात आहे. विरोध दर्शवण्यासाठी चेतन नावाच्या व्यक्तीची हत्या केली असा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय असा ही अंदाज बांधला जात आहे की, वैयक्तीक भांडणावरून चेतनची हत्या करून त्याला 'पद्मावती'च्या विरोधाचं स्वरूप दिलं गेलं. याप्रकरणी पोलिसांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.



या घटनेनंतर 'पद्मावती' प्रदर्शनाच्या मार्गात आता अडथळे निर्माण झाले आहेत. 'पद्मावती' चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण प्रदर्शनाला होणारा विरोध पाहता या चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. पण दिवसेंदिवस 'पद्मावती' चित्रपट प्रदर्शनाचा विषय आणखी चिघळत चालला आहे. त्यामुळे १२ जानेवारीला तरी 'पद्मावती' प्रेक्षकांच्या भेटीला येईल की नाही, हे सांगणं कठीणच आहे.



हेही वाचा

शाहरूखच्या 'डॉन ३'मध्ये प्रियंकाच्या जागी दीपिकाची वर्णी?

बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी असे दिसायचे तुमचे फेव्हरेट सेलिब्रिटी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा