इप्टामध्ये 'खर-खर'

 Grant Road
इप्टामध्ये 'खर-खर'
Grant Road, Mumbai  -  

ग्रँटरोड - इप्टा एकांकिका स्पर्धेत मिठीबाई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची 'खर-खर' गाजली. विविध एकांकिकांनी गाजलेल्या या स्पर्धेत 'खर-खर'ने आपले वेगळेपण सिद्ध करत पहिला क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत नागीनदास खांडवाला महाविद्यालयाच्या हॅश टॅग भीड या एकांकीकेने दुसरा क्रमांक पटकावला. तर अंतिम फेरीमध्ये नसूनसुद्धा प्राथमिक फेरीतील उत्तम सादरीकरणाच्या जोरावर डहाणुकर महाविद्यालयाने तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिठीबाई महाविद्यालयाचा धर्मज जोशी व महर्षी दयानंद महाविद्यालयाचा रोहन सुर्वे यांना विभागून देण्यात आला. तर सर्वोत्तम अभिनेत्रीचा मान पिल्लई महाविद्यालयाच्या सिध्दी बानखेले हिने पटकावला. तसेच मानाचे बलराज सहाणी पारितोषिक मिठीबाई महाविद्यालयाच्या मती राजपूत हिला देण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षक म्हणून मेघना मलिक, तिग्मांशु धुलिया आणि भरत दाभोलकर यांनी काम पाहिले.

Loading Comments