Advertisement

'जाने भी दो यारो'चे दिग्दर्शक कुंदन शहा यांचं निधन


'जाने भी दो यारो'चे दिग्दर्शक कुंदन शहा यांचं निधन
SHARES

प्रसिद्ध हिंदी सिने दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक कुंदन शहा यांचं शनिवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईतील राहत्या घरी निधन (६९) झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण हिंदी सिनेसृष्टी शोकाकूल झाली आहे.

कुंदन शहा यांनी 'नुक्कड', 'वागले की दुनिया' अशा लोकप्रिय मालिकांद्वारे सर्वसामान्यांचं जगणं लहान पडद्यावर अत्यंत परिणामकारक पद्धतीनं रंगवलं होतं. समांतर सिनेमातील माईलस्टोन ठरलेला 'जाने भी दो यारो' आणि शाहरूखसोबतचा 'कभी हा कभी ना' हे दोन वेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांच्यातील संवेदनशील प्रतिभेचं दर्शन घडविणारे सिनेमे म्हणता येतील.

आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती, वातावरणाविषयी कुंदन शहा अत्यंत सगज असायचे. मात्र हीच परिस्थिती लहान पडदा वा मोठ्या पदड्यावर रेखाटताना त्यांच्यातील प्रतिभेचे असंख्य कंगोरे दिसायचे. हलक्याफुलक्या नर्मविनोदी शैलीतून तत्कालीन राजकीय, व्यावसायिक व्यवस्थेवर तिरकस भाष्य करणारा 'जाने भी दो यारो' (१९८३) याचा उत्कृष्ट नमूना. हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजल्याने या सिनेमासोबत त्यांचं नाव शेवटपर्यंत जोडलं गेलं. या सिनेमासाठी कुंदन शहा यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

कुंदन शहा यांनी खामोश, हम तो मोहब्बत करेगा, पी से पीएम तक, क्या कहना, एक से बढकर एक या चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं. देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. सरकारच्या निष्क्रियतेच्या विरोधात त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारही परत केला होता. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीने एक संवेदनशील कलावंत गमावला आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा