Advertisement

आफ्रिकन झाला 'झिंगाट'!


आफ्रिकन झाला 'झिंगाट'!
SHARES

सैराटमधल्या अजय अतुलने साकारलेल्या 'झिंगाट' या गाण्याने प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलं होतं. आज ही 'झिंगाट' गाणं लागलं की आपोआपच सगळ्यांचे पाय थिरकायला लागतात. आता या प्रेक्षकांमध्ये एक आफ्रिकन प्रेक्षकही सामिल झाला आहे. सॅम्युअल सिंग असं या आफ्रिकन तरुणाचं नाव आहे.

या आफ्रिकन गायकाने खास त्याच्या स्टाइलमध्ये ‘झिंगाट’ गाणं गायलं आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांचं कौतुकही केलंय.तुम्हाला प्रश्न पडला असेल आफ्रिकन असूनही त्याचं आडनाव सिंग कसं? खरंतर त्याचं खरं नाव अॅडिपोजू आहे. सॅम्युअल हनी सिंगचा खूप मोठा फॅन आहे आणि त्यामुळेच त्याने स्वतःचे आडनाव बदलून सिंग असे ठेवले आहे.

तुम्ही अजूनही जर सॅम्युअलने गायलेलं झिंगाट ऐकलं नसेल तर नक्की ऐका....

 



हेही वाचा

सांगत्ये ऐका... - मयुरी देशमुख


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा