Advertisement

'क्विन्स ऑफ कॉमेडी'मध्ये रिचा चड्डा!


'क्विन्स ऑफ कॉमेडी'मध्ये रिचा चड्डा!
SHARES

अभिनेत्री रिचा चड्डाने आजवर मोठ्या पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे ती आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. पण आता रिचा छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. 'क्वीन्स ऑफ कॉमेडी' या महिला कॉमेडियन्सना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या पहिल्या महिला कॉमेडी शोमध्ये ती दिसणार आहे. रिचा यात परिक्षकाची भूमिका साकारणार आहे. यात तिच्या जोडीला एआयबीचा फनी मॅन रोहन जोशी आणि कॉमेडियन कानीझ सुर्का असणार आहे.



'क्वीन्स ऑफ कॉमेडी' हा शो २४ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. शनिवार आणि रविवारी रात्री १० वाजता टीएलसी चॅनेलवर हा शो ब्रॉडकास्ट केला जातो. 



'क्वीन्स ऑफ कॉमेडी' हा भारतातील आजवरचा टीव्हीवरील पहिला महिला कॉमेडी शो आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा