... म्हणून कपिल शर्मा शोमधून सिद्धू गेले, कपिलचा खुलासा

शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार हजेरी लावत असतात. नुकतच पागलपंती (PagalPanti) या चित्रपटाची सगळी स्टारकास्ट कपीलच्या शोमध्ये आली होती.

SHARE

छोट्या पडद्यावचा 'द कपिल शर्मा शो' सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्याचा शोला प्रेक्षकांची चांगली डिमांड आहे. मध्यंतरी शोचा टिआरपी थोडा घसरला होता. पण पुन्हा एकदा हा शो टिआरपीच्या शर्यतीत अव्वल आला. या शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार हजेरी लावत असतात. नुकतच पागलपंती (PagalPanti) या चित्रपटाची सगळी स्टारकास्ट कपीलच्या शोमध्ये आली होती.

गेल्या शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस अनिल कपूर (Anil Kapoor), अरशद वारसी (Arshad warsi), जॉन अब्राहम (John Abraham) आणि उर्वशी रौतेला (Urvashi rautela) पागलपंतीची स्टारकास्ट कपिलच्या शो पाहायला मिळाली. यावेळी सगळ्यांनीच चांगलीच धमाल केली. या शोचा व्हिडीओ कपीलनं सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यात सिद्धू पाजींनी शो का सोडला? याचं कारण कपिलनं सांगितलंय.

झालं असं की, कपीलच्या शोवर आलेल्या उर्वशीसोबत कपील खूपच प्रेमानं बोलत होता. तेव्हा अनिल कपूर म्हणाले, उर्वशीसोबत बोलताना तुझा वेगळाच अंदाज असतो. त्यावर कपीलनंही खास उत्तर दिलं. तो म्हणाला, उर्वशीची जादू कायमच असते. उर्वशीनेच तपस्या भंग केलीय. मागच्या वेळी जेव्हा उर्वशी इथं आली होती तेव्हा ती सिद्धू पाजीं तिच्या मागेमागे गेले. त्यानंतर ते पुन्हा इथं परत आलेच नाहीत. कपीलच्या या खुलाश्यावर सगळेच हास्यकल्लोळात बुडून गेले.हेही वाचा

'गुड न्यूज' चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

गुन्हेगारी विश्वाचा वेध घेणारा ‘आयपीसी ३०७ए’


संबंधित विषय
ताज्या बातम्या