Advertisement

गुन्हेगारी विश्वाचा वेध घेणारा ‘आयपीसी ३०७ए’

‘आयपीसी ३०७ ए’मधून जरी माफिया जगाची कथा सादर होणार असली तरीदेखील त्यातील एक भावनिक बाजूदेखील प्रेक्षकांसमोर येणार आहे.

गुन्हेगारी विश्वाचा वेध घेणारा ‘आयपीसी ३०७ए’
SHARES

गुन्हेगारी विश्वाचा वेध घेणारा ‘आयपीसी ३०७ए’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून माफिया जगाची कथा उलगडण्यात येणार आहे. ‘आयपीसी ३०७ ए’ मधून जरी माफिया जगाची कथा सादर होणार असली तरीदेखील त्यातील एक भावनिक बाजूदेखील प्रेक्षकांसमोर येणार आहे.

स्वप्नील देशमुख दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साकार राऊत यांनी केली आहे. तर अर्थ स्टुडिओजअंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सचिन देशपांडे महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सचिनसोबत अन्यही कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. मात्र त्याच्या सह कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, निर्माता साकार राऊत यांनी यापूर्वी संघर्षयात्रा आणि शिव्या या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. मात्र ‘आयपीसी ३०७ ए’ मधून ते पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत.हेही वाचा

१२ वर्षांनंतर अजय-काजोल एकत्र, 'तानाजी' चित्रपटातील काजोलचा मराठमोळा अंदाज

सड्डा नाम 'लाल सिंह चड्डा'


संबंधित विषय
Advertisement