'द कपिल शर्मा शो'चं शुटिंग बंद

 Kurla
'द कपिल शर्मा शो'चं शुटिंग बंद
Kurla, Mumbai  -  

मुंबई - कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरमधील वाद आणखीनच चिघळत चालला आहे. पण त्यांच्या या भांडणाचा परिणाम 'द कपिल शर्मा' या शोवर होत आहे. बुधवारच्या शोसाठी पाहुणे कलाकार आलेच नाहीत. शिवाय टीम मेंबर्सनेही शोकडे पाठ फिरवली. त्यामुळे कपिलला शोचं शूटिंगच रद्द करावं लागलं.

कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाल्यानंतर सुनीलसोबत चंदन प्रभाकर, सुगंधी मिश्रा, अली असगर शूटिंगला गैरहजर राहिले. त्यामुळे कपिलने त्याचे जुने मित्र आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव, एहसान कुरेशी आणि सुनील पाल यांना शेवटच्या क्षणी बोलावले. त्यावेळी 'नाम शबाना' या चित्रपटाची टीम शोमध्ये येणार होती. राजू श्रीवास्तव, एहसान कुरेशी आणि सुनील पाल यांच्या सोबतीने त्यादिवशीचे कसेबसे शूटिंग झाले. पण त्यानंतर बुधवारी होणाऱ्या शूटिंगला कलाकार आलेच नाहीत. टीम मेंबर्सनेही पाठ फिरवली. फक्त किकू शारदा आणि रोशेल हे शूटिंगसाठी हजर होते. पण फक्त दोघांसोबत शूटिंग कसं करणार म्हणून कपिलने शूटिंगच रद्द केलं.

आणखी वाचा- कपिल शर्माचा माफीनामा, सुनील ग्रोव्हरची नाराजीLoading Comments