कॉमेडिअन कपिल शर्माचं लवकरच पुनरागमन

कॉमेडियन कपिल शर्मा दिवाळीच्या मुहुर्तावर प्रेक्षकांना एक चांगलीच भेट देणार आहे. पुन्हा एकदा कपिल शर्मा टेलिव्हिजन क्षेत्रात पुनरागमन करणार आहे.

कॉमेडिअन कपिल शर्माचं लवकरच पुनरागमन
SHARES

मोठ्या ब्रेकनंतर कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही महिने टेलिव्हिजन क्षेत्रापासून दूर असणारा कपिल शर्मा एका शोच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा पुन्हा कमबॅक करणार याच्या चर्चा होत्या. पण यासंदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. पण कपिल शर्मा यानं यासंदर्भात नुकतंच ट्वीट केलं आहे.

कपिल शर्मा नव्या जोमानं कामाला लागला असून सोनी टीव्हीवर पुन्हा एकदा तो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. सोनी टीव्हीवरील कपिल शर्मा शो घेऊन तो पुन्हा येतोय. यासंदर्भात त्यानं ट्वीट केलं आहे की, सोनी टीव्हीवर मी कपिल शर्मा शो घेऊन लवकरच येत आहे. कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच आनंदाची असेल यात काही शंका नाही, असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

'कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा' हा सोनी टीव्हीवरील शो प्रेक्षकांच्या चांगला पसंतीस उतरला होता. पण सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात झालेल्या वादाचा शोवर देखील परिणाम झाला. या वादानंतर सुनील ग्रोवर आणि काही सदस्यांनी कपिल शर्मा शो सोडला. त्यानंतर शोला उतरती कळा लागली. त्यात कपिल शर्माची तब्येत देखील ठिक नव्हती. या सर्व कारणास्तव अखेर शो बंद झाला. कपिलनं देखील ब्रेक घेऊन स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष दिलं. पूर्णपणे बरा झाल्यानंतरच कपिल टेलिव्हिजनवर पुनरागमन करणार आहे.हेही वाचा

आठ वर्षांनी नवरा-बायको पुन्हा एकत्र

'बघा' यामी गौतमचा 'बोल्ड अँड ब्युटीफूल' लूक!संबंधित विषय