'करार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

  मुंबई  -  

  गोरेगाव - मनोज कोटियन दिग्दर्शित 'करार' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतंच या सिनेमाचं ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च गोरेगाव इथल्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये झाला. प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या आणि संघर्ष या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमात सुबोध भावे आणि उर्मिला कानेटकर कोठारी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येतायेत. त्याचबरोबर क्रांती रेडकर ही या सिनेमात दिसणार आहे.

  सिनेमातील गाण्याबद्दल या तिघांनीही भरभरून कौतूक केलं. संगीत दिग्दर्शक विजय गवंडे आणि परेश शाह यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, बेला शेंडे, सोनू कक्कर, जसराज जोशी, नेहा राजपाल आणि वैशाली सामंत अशा सुरमयी गायकांचा आवाज लाभला.
  आजच्या धावत्या जगात बदलत चाललेली मातृत्वा बद्दलची मानसिकता सांगणारा हा सिनेमा लवकरच संपूर्ण चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.