Advertisement

ती सध्या नक्की करतेय काय? वाचा!


ती सध्या नक्की करतेय काय? वाचा!
SHARES

टीव्हीवरील आपल्याला आवडणारी एखादी मालिका संपली, की त्यात अभिनय करणारे कलाकार अचानक गायब होतात. मग त्या मालिकेतले कलाकार आता काय करत असतील? याची उत्सुकता कायम प्रेक्षकांच्या मनात असते. अशीच काहीशी उत्सुकता 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतल्या मानसीची भूमिका साकारणाऱ्या मयुरी देशमुखबद्दल प्रेक्षकांच्या मनात लागून राहिली होती. ती सध्या काय करते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. मात्र, आता याचं उत्तर खुद्द मयुरीनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं आहे.



मयुरीचे नवं रुप कोणतं?

एका नवीन रुपात मयुरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजपर्यंत आपण तिला एक अभिनेत्री म्हणून ओळखत होतो. मात्र, आता एक लेखिका म्हणून ती आपल्या समोर येत आहे.


...यासाठी मयुरी उत्सुक

मयुरीने आता 'डीअर आजो' या नाटकाचं लेखन केलं आहे. लवकरच हे नाटक रंगभूमीवर येत आहे. या नाटकासाठी मयुरी फार उत्सुक आहे. नाटकाच्या लेखनाबरोबरच ती नाटकात काम देखील करत आहे. मयुरीने ही बातमी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना दिली आहे. मयुरीच्या या पोस्टमुळे आपली लाडकी अभिनेत्री सध्या काय करते? याचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे.

याआधी 'खुळता कळी खुलेना'मध्ये मयुरीच्या अभिनयावर सारेच फिदा होते. मालिकेतील तिचा साधा सरळ स्वभाव, तिचा सिंपल लुक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यामुळे, आता मयुरीला प्रेक्षक नव्या रुपात स्वीकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



हेही वाचा

सांगत्ये ऐका... - मयुरी देशमुख

मयुरी देशमुख अडकली लग्नबंधनात


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा