Advertisement

क्रिती सेनॉनला वाढदिवसा दिनी सरप्राईज, ठरलेल्या तारखेआधीच 'हा' चित्रपट प्रदर्शित

अभिनेत्री क्रिती सेनॉनला वाढदिवसा दिनी चांगलंच सप्राईज मिळालं आहे.

क्रिती सेनॉनला वाढदिवसा दिनी सरप्राईज, ठरलेल्या तारखेआधीच 'हा' चित्रपट प्रदर्शित
SHARES

अभिनेत्री क्रिती सेनॉनला वाढदिवसा दिनी चांगलंच सप्राईज मिळालं आहे. तिच्या वाढदिवसा दिवशी मीमी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा आता जाहीर केलेल्या तारखेआधीच रिलीज करण्यात आला आहे.

पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन आणि सई ताम्हणकर यांची मुख्य भूमिका असलेला मीमी सिनेमा ३० जुलैला नेटफ्लिक्स आणि जीओ सिनेमावर रिलीज होणार होता.

या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली होती. सोमवारी संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि पंकज त्रिपाठी यांनी सिनेमाच्या टीमसोबत इन्स्टाग्रामवर एक लाइव्ह सेशन केलं. यावेळीच सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा केली.

हा सिनेमा टेलिग्रामवर लीक झाल्याची माहिती सिनेमाच्या टीमच्या हाती लागल्याने सिनेमा आधीच रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा सिनेमा सरोगसीवर आधारित आहे. सिनेमा लीक झाल्याचं कळताच संपूर्ण टीमनं महत्वाचा निर्णय घेत सिनेमा सोमवारी रिलीज करत क्रिती सेनॉनला देखील खास सरप्राईज दिलं आहे.

क्रिती सेनॉननं सिनेमाच्या टीमसोबत सोमवारी संध्याकाळी एक लाइव्ह सेशन केलं. खरं तर क्रिती सेनॉन प्रॉडक्शन हाउसच्या ऑफिसमध्ये गेली होती. इथं एक दिवस आधीच तिच्यासाठी बर्थ डे पार्टी आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान तारखेआधीच सिनेमा रिलीज होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सिनेमात क्रिती आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबतच मनोज पाहवा आणि सुप्रिया पाठक प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ‘मीमी’ हा सिनेमा समृद्धी पोरे यांच्या २०११ सालातील ‘आई व्हायचंय मला’ या राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या सिनेमाचा रिमेक आहे.हेही वाचा

KRK वर बलात्काराचा आरोप, मॉडेलनं केली पोलिसात तक्रार

करण जोहर करणार बिग बॉस होस्ट, तर सलमान खान...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा