कुमार सानू यांचे 'हलके हलके' बोल...

 Andheri
कुमार सानू यांचे 'हलके हलके' बोल...
Andheri, Mumbai  -  

मुंबई - मराठी सिनेविश्वात सध्या अनेक बदल होत आहेत. मराठी सिनेमांच्या चांगल्या कथा नवीन निर्मात्यांना आकर्षित करत आहेत. ब्रम्हांडनायक मुव्हीज या निर्मिती संस्थेनं 'ढोल ताशे' हा आशयघन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणला होता. असाच अजून एक सिनेमा ब्रम्हांडनायक मुव्हीज आणि ए .आर फिल्मस् एकत्रित निर्मिती असलेला 'हलके हलके' हा सिनेमा लवकरचं आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कुमार सानू यांच्या सुरेल आवाजात एक रोमँटिक गाणं असेल.

नुकतंच अंधेरीतल्या 'सना म्युझिक वर्ल्ड' येथे हे गाणं रेकॉर्डही करण्यात आलं. 'हलके हलके बोलणे' असे या गाण्याचे बोल अाहेत. सिनेमाच्या निर्मात्या ए. अनुराधा यांचं हे गायिका म्हणून पहिलंच गाणं असलं, तरी त्यांनी कुमार सानू यांना मोलाची साथ दिली आहे. 'ढोल ताशे' या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पर्दापण करणारे राज अंजुटे 'हलके हलके' या सिनेमातून दिग्दर्शनात पर्दापण करतायत. सिनेमातल्या कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

Loading Comments