Advertisement

लक्ष्मीसमोर येणार मल्हारचं वेगळं रूप !

अजिंक्यने लक्ष्मीची समजूत काढल्याचंच कुठेतरी दु:ख, किंवा राग मल्हारच्या मनामध्ये आहे. लक्ष्मीला मागील काही दिवसांपासून एक आहे आणि ते म्हणजे मल्हारचा बदलेला स्वभाव.

लक्ष्मीसमोर येणार मल्हारचं वेगळं रूप !
SHARES

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेत आता एक अनपेक्षित वळण आलं आहे. त्यामुळेच लक्ष्मीच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडत आहेत. मध्यंतरी लक्ष्मीने अजिंक्यबरोबर अबोला धरला होता. अजिंक्यने त्याच्या मनातील भावना लक्ष्मीला सांगितल्यामुळे लक्ष्मीने अजिंक्यशी बोलणं बंद केलं होतं. परंतु आता मात्र अजिंक्यने लक्ष्मीची समजूत काढली असून त्यांच्या मधील मैत्री कायम आहे. याच दरम्यान लक्ष्मीला मल्हारचं एक नवं रूप दिसणार आहे. 


लक्ष्मीला पडलं कोडं 

अजिंक्यने लक्ष्मीची समजूत काढल्याचंच कुठेतरी दु:ख, किंवा राग मल्हारच्या मनामध्ये आहे. लक्ष्मीला मागील  काही दिवसांपासून एक  आहे आणि ते म्हणजे मल्हारचा बदलेला स्वभाव. ज्याची काळजी आता लक्ष्मीला वाटते आहे. कारण मल्हारच्या अशा विचित्र वागण्या मागचं कारण तिला कळत नाही आहे. असे काहीसे दिवाळीमध्ये पाडव्याची दिवशी घडले होते.


मल्हार अट

मल्हारने एक वेगळीच अट लक्ष्मीला घातली होती. आणि ती म्हणजे संध्याकाळी ७ वाजता लक्ष्मीने मल्हारला पहिल्यांदा ओवाळावे. आणि आर्वीसाठी लक्ष्मीला मल्हारची ती अट मान्य करावी लागली होती. पण मल्हारच्या अशा विचित्र वागण्याने लक्ष्मी द्विधा मनस्थितीमध्ये आहे. हा गुंता लक्ष्मी कसा सोडवेल ? लक्ष्मी समोर मल्हारचे कोणते वेगळे रूप येईल ? लक्ष्मी ही परिस्थती कशी हाताळेल ? हे आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.


शत्रू बनून स्वत:समोर 

लक्ष्मी आणि अजिंक्यमध्ये वाढणाऱ्या मैत्रीमुळे मल्हारला बराच त्रास होत आहे. मल्हारच्या लक्ष्मीवरील वाढत्या प्रेमामुळे त्याला आता लक्ष्मी आणि अजिंक्य मधली मैत्री देखील तोडायची आहे . दुसरीकडे अजिंक्यने लक्ष्मीची मैत्री आणि विश्वास पुन्हा मिळवला असून केवळ लक्ष्मीच्या आग्रहाखातर तो कुस्ती खेळण्यास तयार झाला आणि त्याने तो सामना जिंकला देखील. आता लवकरच मल्हार लक्ष्मीला त्याला वाटणाऱ्या भावना आणि प्रेम तिच्या जवळ व्यक्त करणार असून लक्ष्मीला तिचा हक्क देखील मिळून देणार आहे . परंतु हे सगळ होत असताना मल्हारचा एक वेगळाच चेहरा लक्ष्मी समोर येणार असून मल्हारच स्वत:चा मोठा शत्रू बनून स्वत:समोर उभा रहाणार आहे.



हेही वाचा - 

रोहितचं म्युझिकल बर्थडे गिफ्ट

स्वप्नील मुक्ताला म्हणतो, आई तू बाबा मी होणार गं...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा