Advertisement

लता मंगेशकरांच्या प्रकृत्तीबद्दल डॉक्टर म्हणाले...

कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्यानं ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लता मंगेशकरांच्या प्रकृत्तीबद्दल डॉक्टर म्हणाले...
SHARES

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आठवडाभरापूर्वीपासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्यानं ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital Mumbai) दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मात्र भारतरत्नं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. दीदींना लवकर बरं वाटावं यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. गेल्या दहा दिवसांपासून ब्रीच कँडी रूग्णालयातील आयसीयूमध्ये लतादीदींवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबरोबरच न्युमोनियाही झालेला असल्यानं प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

उपचारांना थोडाबहुत प्रतिसाद मिळत असला तरी अपेक्षेइतकी प्रकृतीत सुधारणा नाही. उपचार करणा-या डॉक्टरांची वेट अँड वॉचची भूमिका आहे. लता दीदींना ११ जानेवारी रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ब्रिच कँडी रूग्णालयातील ICU मध्ये दाखल केले होते.

याआधीही नोव्हेंबर २०१९ मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना २८ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.



हेही वाचा

‘कोन नाय कोन्चा’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल

नार्को क्वीन शशिकला पाटणकर यांच्या आयुष्यावर वेब सिरीज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा