श्रीदेवी झाली आई

 Mumbai
श्रीदेवी झाली आई
Mumbai  -  

मुंबई - 'मिस हवाहवाई' पुन्हा एकदा नव्या आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात भूमिका साकारताना दिसेल. मातृत्वाची एक वेगळी बाजू माडणाऱ्या 'माँ' या चित्रपटात श्रीदेवी झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झालाय. श्रीदेवीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर 'माँ' चित्रपटाचा पोस्टर शेअर केलाय.

'जेव्हा एखाद्या स्त्रीसमोर आव्हाहनं येतात,' असे या फोटोसोबत एक कॅप्शनही दिले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आई हा शब्द अनेक भाषेत लिहला आहे. या पोस्टरमध्ये श्रीदेवीचा लूक साधा आणि सोबर आहे. 4 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Loading Comments