Advertisement

'लिबर्टी' झालं पुन्हा स्वतंत्र


SHARES

मरीन लाइन्स - लिबर्टीत सिनेमा पाहायला जायचं म्हणजे मोठा तामझाम. मऊसर लाल गालिचे, जबरदस्त डेकोरेशन, टंगस्टन लाइटच्या पिवळसर प्रकाशात उजळलेल्या भिंती आणि चकचकणारा माहौल. पण बदलत्या परिस्थितीमुळे ही चकाकी नाहिशी होऊ लागली. लिबर्टीलाही मल्टिप्लेक्सशी स्पर्धा करता आली नाही आणि 2012 पासून तिथं सिनेमे प्रदर्शित होणं थांबलं. मात्र चार वर्षानंतर या थिएटरमध्ये हिंदी सिनेमा झळकला आणि सुरुवात झाली दंगल सिनेमापासून.

उत्तम वास्तूशास्त्र आणि बांधकामाचा उत्कृष्ट नमूना, सांस्कृतिक वारसा जपणारं लिबर्टी थिएटर. पुन्हा एकदा नव्या रंगात आणि ढंगात आलंय. बदलत्या काळानुसार लिबर्टीमध्ये बदल करण्यात आलेत. थिएटरमध्ये आत्याधुनिक प्रोजेक्टर बसवण्यात आलेत. नव्या अवतारात जरी थिएटर उभे असले तरी जुने ते सोनेच हो. अमेरिकेतून मागवलेल्या खास पुशबॅक खुर्च्या ही वैशिष्ट्यपूर्ण आसनव्यवस्था आजही इथली खासियत आहे.

लिबर्टी थिएटरचं बांधकाम 1947 मध्ये पूर्ण झालं. हबीब हुसेन यांनीच या थिएटरचं डिझाइन केलं होतं. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीची एक खूण म्हणून हबीब यांनी थिएटरला ‘लिबर्टी’ असं नाव दिलं. लिबर्टीत पहिला सिनेमा प्रदर्शित झाला तो मेहबूब खान यांचा ‘अंदाज’! त्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे हबीब यांनी लिबर्टी कॉण्ट्रॅक्ट बेसिसवर चालवायला दिलं. पण इथून लिबर्टीला उतरती कळा लागली. पण 5 ऑगस्ट 1994ला राजश्री प्रॉडक्शननं बहुचर्चित असा ‘हम आपके है कौन’ या सिनेमाचा प्रीमियर लिबर्टीत केला.

गेले 4 वर्ष लिबर्टी थिएटर चित्रपटांसाठी बंद असलं तरी इथं अनेक इव्हेंट्स झालेत आणि आजही होतात. एकूणच काय तर पुन्हा एकदा हे थिएटर प्रेक्षकांच्या मनावर 'दंगल' गाजवायला सज्ज झालंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा