10 फेब्रुवारीला 'ध्यानीमनी' प्रेक्षकांच्या भेटीला

वांद्रे - काकस्पर्श, नटसम्राट या चित्रपटांनंतर आता महेश मांजरेकरांच्या कार्यशाळेतला आणखी एक सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'ध्यानीमनी' नावाचा हा चित्रपट येत्या 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 1993 साली महेश मांजरेकरांचं ध्यानीमनी हे नाटक आलं होतं. आता त्याच विषयावर आधारित हा सिनेमा येतोय. निर्माते महेश मांजरेकर, अभिनेत्री आश्विनी भावे, मृण्मयी देशपांडे आणि अभिनेता अभिजित खांडकेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

आत्तापर्यंत अनेक आशयसंपन्न नाटकं आणि चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. टिपिकल धाटणीचा सिनेमा न बनवता प्रवाहाविरूद्ध जात हा विषय निवडल्याचं या स्टारकास्ट्सचं म्हणणंय. पण शेवटी हा वेगळा विषय प्रेक्षकांच्या पसंतीस कितपत उतरतो, हे मात्र 10 फेब्रुवारीलाच कळेल.

Loading Comments