Advertisement

मकरंद बनला मुंबईचा डबेवाला

विविधरंगी भूमिका साकारणारे मकरंद 'Thank U विठ्ठला' या आगामी मराठी चित्रपटातून मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मकरंद बनला मुंबईचा डबेवाला
SHARES

विनोदी अभिनयासोबतच आपल्या धीरगंभीर भूमिकांद्वारे कधी हसवणारा, तर कधी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा कसदार अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे. आजपर्यंत विविधरंगी भूमिका साकारणारे मकरंद 'Thank U विठ्ठला' या आगामी मराठी चित्रपटातून मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. लंडनच्या प्रिन्सनेही ज्यांची दखल घेतली अशा मुंबईतील डबेवाल्यांनी आजवर भुकेल्या मुंबईकरांना वेळेवर जेवणाचा डबा पोहोचवून त्यांची क्षुधाशांती केली आहे. आता हाच डबेवाला मराठी सुपरस्टार मकरंद अनासपुरेंच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.वेगळ्या भूमिकेचं समाधान

या भूमिकेच्या माध्यमातून डबेवाल्यांच्या अनोख्या विश्वाचा वेध घेतला जाणार आहे. एकत्र रहात सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्येही हिरीरीने सहभागी घेणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांचं प्रतिनिधीत्व करणारी भूमिका साकारताना आजवर केलेल्या कामापेक्षा काहीतरी खूप वेगळं केल्याचं समाधान लाभल्याची भावना मकरंद यांनी व्यक्त केली आहे. कंटाळवाणं दैनंदिन जीवन जगणाऱ्या मकरंदने साकारलेल्या डबेवाल्याला भगवान विठ्ठलाची साथ लाभल्यानंतर त्याच्यात काय बदल होतात आणि त्यानंतर त्याचा जीवनप्रवास कसा सुखकर होतो ते 'Thank U विठ्ठला'  या चित्रपटात पाहायला मिळेल. या चित्रपटात मकरंदच्या जोडीला महेश मांजरेकर, दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट असे कलाकार पाहायला मिळणार आहेत. ३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

नवाजुद्दीनने 'हिच्या'सोबत केला 'वन नाईट स्टँड'संबंधित विषय
Advertisement