हल्ली सर्वच कलाकार सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह झालेले पाहायला मिळतात. आपल्या आयुष्यातील खूप छोटे छोटे क्षणही ही कलाकार मंडळी सोशल प्लॅटफॉर्मवर आपल्या फॅन्स बरोबर शेअर करत असतात. सध्या हिंदी मालिका 'मे आय कम इन मॅडम'मध्ये आपल्या हॉट अंदाजाने प्रसिद्ध असलेली मराठी कलाकार 'नेहा पेंडसे' तिच्या वायरल झालेल्या व्हिडीओमुळे जास्तच चर्चेत आली आहे. त्या व्हिडिओत ती चक्क पोल डान्स करतेय.
नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोल डान्स करत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्या व्हिडीओ बरोबर तिने 'खूप दिवसांच्या ब्रेकनंतर मी पुन्हा एकदा माझ्या पहिल्या प्रेमाकडे जातेय. जेव्हा आपले शरीर सुदृढ असते, तेव्हा चांगले फोटो येतात. ट्रेनिंग सुरू झाली आहे,’ असं लिहिलं आहे. सध्या नेहा शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून पोल डान्स शिकतेय. नेहाने शेअर केलेला हा पहिला व्हिडीओ नसून या आधीही तिने पोल डान्स करत असतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. नेहाने शेअर केलेल्या या व्हिडिओला तिच्या फॅन्सचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
हेही वाचा