Advertisement

डोंबिवालीतल्या पिशवीवाल्या जोशी आजोबांना भेटला शशांक केतकर

आता शशांकनं स्वतः या आजोबांच्या डोंबिवलीतल्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि समोर आला तो जोशी दाम्पत्याचा थक्क करणारा प्रवास

डोंबिवालीतल्या पिशवीवाल्या जोशी आजोबांना भेटला शशांक केतकर
SHARES

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर डोंबिवलीच्या एका आजोबांबद्दल एक पोस्ट खूप व्हायरल झाली होती. हे आजोबा डोंबिवलीतील गावदेवी मंदिराकडे बसून पिशव्या विकतात. त्यांच्याकडून किमान दोन पिशव्या तरी विकत घ्याव्यात अशा आशयाची ही पोस्ट मराठमोळा अभिनेता शशांक केतकरनंही त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली होती.

आता शशांकनं स्वतः या आजोबांच्या डोंबिवलीतल्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि समोर आला तो जोशी दाम्पत्याचा थक्क करणारा प्रवास आणि या वयातील दांडगा उत्साह...


स्वावलंबी जोशी आजी-आजोबा

जोशी आजोबांनी यावेळी शशांकसोबत चांगल्याच गप्पा मारल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. यावेळी आजोबांनी मी माझ्या आनंदासाठी आणि हातपाय मोकळे राहावे यासाठी हे काम करतो. माझ्या घरची परिस्थिती अतिशय सधन आहे आणि मला कशाचीही कमी नाही हेही सांगितलं. फक्त आजोबाच नाही तर जोशी आजी पुरणपोळ्या आणि जेवण्याच्या ऑर्डर घेतात आणि लोकांना पुरवतात. ही माहिती सुद्धा नव्यानं समोर आली. या भेटीचा व्हिडीओ शशांकनं त्याच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.

काय होती पोस्ट?

काही दिवसांपूर्वी शशांकनं त्याच्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हायरल पोस्ट शेअर केली होती आणि ही पोस्ट होती डोंबिवलीच्या जोशी आजोबांची. शशांकनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, सकाळी सकाळी हा फोटो बघून भरून आेलं.. वाईट वाटलं, आनंद झाला, राग आला पण सरते शेवटी या जगात आपण आलो आहोत तर जगण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी काहीतरी काम करत राहण्याशिवाय पर्याय नाही हेही realise झालं. माहितीचा पाठपुरावा केला नाहीये पण तरीही share करतो आहे.

हे जोशी आजोबा, वय वर्ष 87, हे आजोबा गाद्यांच्या दुकानातून पडदा, सोफा यांच्या कव्हरचे उरलेले तुकडे दुकानदारांकडून विकत घेऊन कापडी पिशव्या स्वतः घरीच शिवतात. उदरनिर्वाहासाठी याही वयात त्यांना हे करावे लागते.... 40 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत आजोबांकडे पिशव्या आहेत.आजोबा दर सोमवारी डोंबिवलीच्या गावदेवी मंदिरासमोर आणि गुरुवारी फडके रोड वर बसतात .....ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून एक/दोन पिशव्या तरी जरूर घ्या....’


सोशल मीडियाचा 'असा'ही फायदा

शशांकनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्या खाली आलेल्या कमेंटमध्ये अनेकांनी या आजोबांबद्दल माहिती दिली होती. ज्यामुळे न राहावून आपण या आजोबांची भेट घेतल्याचं शशांक सांगतो. यावेळी शशांकनं केवळ आजोबाच नाही तर जोशी आजींसोबतही खूप गप्पा मारल्या.



हेही वाचा

'गेम ऑफ थ्रोन्स'मधील 'हा' अभिनेताही कोरोनाच्या विळख्यात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा