Advertisement

'गेम ऑफ थ्रोन्स'मधील 'हा' अभिनेताही कोरोनाच्या विळख्यात

हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना घरातील एका खोलीत ठेवण्यात आलं आहे.

'गेम ऑफ थ्रोन्स'मधील 'हा' अभिनेताही कोरोनाच्या विळख्यात
SHARES

कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका चीन पाठोपाठ इटली आणि अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आपतकालीन आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना घरातील एका खोलीत ठेवण्यात आलं आहे. टॉम हँक्स आणि अभिनेत्री ओल्ग कुरिलैंको यांच्यानंतर आता हॉलिवूड अभिनेता इदरिस एल्बानला कोरोना झाला आहे.


व्हिडिओ ट्विटरवर शेअर

कोरोनाची लागण झाल्याचं त्यानं सोशल मीडियावर सांगितलं आहे. त्यानं स्वतःचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं स्पष्ट केलं. इदरिसनं ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं सांगितलं. तसंच याची कोणतीही लक्षणं त्याला जाणवत नसल्याचंही तो म्हणाला. त्याची प्रकृती चांगली असल्याचंही त्यानं यावेळी सांगितलं.


काय म्हणाला इदरिस?

त्यानं ट्वीट करत म्हटलं की, 'आज सकाळी मला कळालं की मी करोना पॉझिटीव्ह आहे. मला बरं वाटतंय आणि अजूनपर्यंत करोनाची कोणतीही लक्षणं माझ्यात जाणवतं नाहीयेत. असं असलं तरी मी स्वतःला सगळ्यांपासून वेगळं ठेवलं आहे. सर्वांनी घरात राहा आणि योग्य ती काळजी घ्या. घाबरण्याचं काही कारण नाही. मी माझ्या तब्येतीबद्दल वेळोवेळी सांगत राहीन.'


'या' अभिनेत्रीनं स्वत:ला कोंडलं

प्रसिद्ध मॉडेल आणि सेलिब्रिटी हाइडी क्लुमनेही स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं असून तिला करोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय आहे. करोनाच्या तिने चाचण्याही केल्या पण अजूनपर्यंत त्याचं निदान झालेलं नाही. जागतिक आरोग्य संस्थेनं कोरोनाला संसर्गजन्य रोग म्हणून घोषित केलं आहे. करोनाच्या हाहाकारानंतर अनेक कार्यक्रम, सभा आणि सिनेमा, मालिकांचं चित्रीकरण तातडीनं बंद करण्यात आलं.



हेही वाचा

सिंगर अनूप जलोटा आयसोलेशनमध्ये, अभिनेत्री रश्मी देसाईची तपासणी

Coronavirus : दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा