Advertisement

वैभव-प्रार्थनाचं लागणार ‘व्हॉट्सअॅप लग्न’


वैभव-प्रार्थनाचं लागणार ‘व्हॉट्सअॅप लग्न’
SHARES

‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटातील वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहेरे ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आत ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. ‘व्हॉट्सअॅप लग्न’ या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा वैभव-प्रार्थनाची केमिस्ट्री अनुभवता येणार आहे. ‘नटसम्राट’चे निर्माते विश्वास जोशी आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते नानू जयसिंघानी यांनी प्रथमच एकत्र येत ‘व्हॉट्सअॅप लग्न’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.



हिंदी चित्रपटसृष्टीत एखादा सिनेमा येणार असेल, तर त्याची तारीख ६-७ महिने आधीच जाहीर केली जाते. त्याप्रमाणेच ‘व्हॉट्सअॅप लग्न’च्या निर्मात्यांनीही जवळजवळ चार महिने अगोदर म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मुबलक वेळ मिळेल हा एक महत्त्वपूर्ण विचारही ‘व्हॉट्सअॅप लग्न’च्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०१८ म्हणजेच पुढल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

जुडवा २ - नव्या बाटलीत जुनी वाइन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा