Advertisement

सई-स्पृहासह विश्वजीतनं केलं श्रमदान

मराठीसोबतच सध्या हिंदीतही चांगलीच पॅाप्युलर असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत कवी मनाची अभिनेत्री अशी ओळख असलेल्या स्पृहा जोशीनं श्रमदान करत पाण्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्राच्या लढाईत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या जोडीला बॅडमिंटनपटू विश्वजीत सांगळेनंही घाम गाळत श्रमदान केलं.

सई-स्पृहासह विश्वजीतनं केलं श्रमदान
SHARES

रुपेरी पडद्यावरील कलाकार केवळ अभिनय आणि त्यांच्या क्षेत्रातील आवश्यक गोष्टींसाठी बौद्धिक श्रम घेत असले तरी शारीरिक श्रम घेण्याची फारशी वेळ त्यांच्यावर येत नाही. केवळ पडद्यावर शारीरिक श्रमदानाची अॅक्टिंग करणाऱ्या काही कलाकारांनी मात्र कामगार दिनाचं औचित्य साधत श्रमदानाचा स्वाद चाखला.


पाण्यासाठी लढाईत सक्रिय

मराठीसोबतच सध्या हिंदीतही चांगलीच पॅाप्युलर असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत कवी मनाची अभिनेत्री अशी ओळख असलेल्या स्पृहा जोशीनं श्रमदान करत पाण्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्राच्या लढाईत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या जोडीला बॅडमिंटनपटू विश्वजीत सांगळेनंही घाम गाळत श्रमदान केलं. आमिर खान आणि किरण राव यांच्या पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रमदान करत या चळवळीत सर्वजण सामील झाले.


आनंद गगनात मावेना

चित्रपटातील एखाद्या सीनप्रमाणे सई खांद्यावर फावडं आणि हातात घमेलं घेऊन श्रमदानासाठी पुढं सरसावली. तिनं कुदळानं जमीन खणून नंतर ती माती स्वत:च घमेल्यातही भरली. स्पृहानंही मोठ्या ताकदीनिशी कुदळानं जमिनीवर घाव घातले. आपली ग्लॅमरस इमेज बाजूला ठेवत दोघींनीही उन्हाची पर्वा न करता श्रमदान केलं. त्यांना पाहून इतर गावकऱ्यांनाही हुरूप आला आणि सेलिब्रिटिंसोबत काम करायला मिळाल्यानं त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सिन्नर तालुक्यातील धोंडबार येथे सई, स्पृहा आणि विश्वजीत यांनी श्रमदानाला हातभार लावला.हेही वाचा -

सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, ८३.४ टक्के निकाल

लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्नसंबंधित विषय
Advertisement