पहा, सईच्या दिलखेचक अदा!

सोशल मीडियापासून दूर गेलेल्या सईच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय यााबाबत तिच्या चाहत्यांना समजत नव्हतं. पण आता सईच्या चाहत्यांना ही चिंताही सतावणार नाही. तिचे काही मनमोहक फोटो 'मुंबई लाइव्ह'कडे आले आहेत.

  • पहा, सईच्या दिलखेचक अदा!
  • पहा, सईच्या दिलखेचक अदा!
  • पहा, सईच्या दिलखेचक अदा!
  • पहा, सईच्या दिलखेचक अदा!
SHARE

आजच्या काळातील बिनधास्त मराठमोळी अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेल्या सई ताम्हणकरनं नेहमीच धाडसी आणि प्रवाहापेक्षा वेगळ्या भूमिकांचा स्वीकार केला आहे. सईनं कायम मराठी सिनेसृष्टीत नवा ट्रेंड आणण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ मराठीपुरतीच मर्यादित न राहता सईनं हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.वेबसिरीजनं वेड लावलं

मराठी-हिंदीसोबतच सईनं मल्याळम-तमिळ सिनेमांमध्येही आपलं नशीब आजमावलं आहे. नुकतीच प्रदर्शित झालेल्या सईच्या 'डेट विथ सई' या वेबसिरीजनंही प्रेक्षकांना वेड लावलं होतं. यातील अभिनय आणि व्यक्तिरेखेमुळे सईच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. तसंच, 'लव्ह सोनिया' या हिंदी सिनेमातील तिच्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं.सोशल मीडियापासून दूर

मागील बऱ्याच दिवसांपासून इंटरनॅशनल इव्हेन्ट्स आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये आपल्या ग्लॅमरचा जलवा दाखवणारी सई मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियापासून दूर गेली. त्यामुळे तिच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय यााबाबत तिच्या चाहत्यांना समजत नव्हतं. पण आता सईच्या चाहत्यांना ही चिंताही सतावणार नाही. तिचे काही मनमोहक फोटो 'मुंबई लाइव्ह'कडे आले आहेत. ज्यात सईच्या दिलखेचक अदा पाहायला मिळतात.हेही वाचा -

कुलाबा संक्रमण शिबिरातील कुटुंबियांना हक्काचं घर मिळणार

केतकीला लाभली राहुलची 'साथ...'संबंधित विषय
ताज्या बातम्या