शुक्रवारपासून मराठी एकांकिका स्पर्धा

Dadar
शुक्रवारपासून मराठी एकांकिका स्पर्धा
शुक्रवारपासून मराठी एकांकिका स्पर्धा
See all
मुंबई  -  

दादर - श्रीकांत ठाकरे यांच्या स्मरणार्थ आयोजित होणाऱ्या खुल्या मराठी एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला 4 नोव्हेंबरपासून सुरुवात होतेय. यंदा या स्पर्धेचं 10 वं वर्ष असून प्राथमिक फेरीत 45 एकांकिका सादर होणार आहेत. पहिल्याच दिवशी 15 एकांकिका सादर होणार आहेत. त्यामुळे सकाळी 9 पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत व्टिस्ट अँन्ड टर्न घेऊन येणाऱ्या एकांकिकाही सादर होणार असल्याचं समजतंय. त्यात झिरो बजेट प्रोडक्शनची ओवी, मॉडेल कॉलेज डोंबिवलीची अल्पविराम आणि अथांग प्रोडक्शनची द थेस्पोरिअस यांचा समावेश आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी 4,5 आणि 6 तारखेदरम्यान शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे रंगणार आहे. अंतिम फेरी 17 डिसेंबर 2016 रोजी रवींद्र नाट्यमंदिरात होईल.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.