‘मांजा’ चित्रपट २१ जुलैला प्रदर्शनासाठी सज्ज!

  मुंबई  -  

  जतीन वागळे दिग्दर्शित सायकॉलॉजिकल थ्रिलर असा वेगळ्या धाटणीचा चित्रपट नितीन केणी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आणि प्रेक्षकांनी, समीक्षकांनी तसेच कलाकारांनी देखील ट्रेलरला भरभरुन प्रतिसाद दिला.


  किशोरवयीन मुलं मित्रांच्या प्रभावाने लगेच कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ शकतात. मात्र, जर त्यामध्ये एखाद्या चुकीच्या संगतीची भर पडली, तर प्रश्न आणखी गंभीर व धोकादायक बनू शकतो. याच गोष्टीवर भाष्य करणाऱ्या चित्रपट मांजामध्ये अभिनेत्री अश्विनी भावे, सुमेध मुद्गलकर आणि रोहित फाळके प्रमुख भूमिका निभावत आहेत.

  चित्रपटाचा ट्रेलर पाहता, सुमेध मुद्गलकर म्हणजेच विकी हा खूप चतुर, एक्सट्रोव्हर्ट, आतल्या गाठीचा म्हणावा असा मुलगा. तर जयदीप म्हणजेच रोहित फाळके साधा सरळ आणि अबोल पात्र साकारताना दिसतो. अशा या अंतर्मुखी म्हणजेच इन्ट्रोव्हर्ट जयदीपवर विकीचा कसा प्रभाव पडतो. या प्रभावात जयदीप काही चुकीच्या गोष्टी करतो का? जयदीपच्या आईची त्याच्यासाठी असलेली चिंता खरी ठरते का? जयदीपची आई त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहून परिस्थितीशी दोन हात करते का? हे सर्व प्रश्न ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनात काहूर निर्माण करतात आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला नेतात. विकी-जयदीप-त्याची आई, या त्रिकोणातला हा मनोविकृतीवर आधारित लपंडाव कसा रंगतो ते चित्रपट पाहूनच कळेल. हा चित्रपट २१ जुलैला जागतिक पातळीवर प्रदर्शित होणार आहे.
  हेही वाचा

  असा आहे 'बसस्टॉप' सिनेमाचा ट्रेलर!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.