श्रेयस जाधवची 'वीर मराठे' मधून शिवरायांना मानवंदना

 Mumbai
श्रेयस जाधवची 'वीर मराठे' मधून शिवरायांना मानवंदना

मुंबई - 'पुणे रॅप' च्या घवघवीत यशानंतर रॅपर श्रेयस जाधव पुन्हा एकदा एक नवेकोरे रॅपसाँग प्रेक्षकांसमोर घेऊन येतो आहे. या वेळी त्याने शिवरायांवर आधारित 'वीर मराठे' हे हटके गाणे तयार केले आहे. 15 एप्रिल रोजी तिथीनुसार झालेल्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने या गाण्याचा पहिला टिजर पोस्टर रसिकांसाठी प्रदर्शित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या स्तुतीपर गायेलेले हे पहिलेच रॅपसॉंंग असून, या गाण्याद्वारे तो शिवरायांना मानवंदना देणार आहे.

एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली प्रसिद्ध होणारे 'वीर मराठा' या रॅप गाण्याला हर्ष, करण आणि अादित्य यांनी ताल दिला असून, सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन आणि कॉरियोग्राफी केली आहे. या गाण्याचे बोल आणि रॅप स्वतः श्रेयस ने लिहिले आणि गायले आहे.

Loading Comments